गृह मंत्रालय (भारत)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

गृह मंत्रालय (इंग्रजी:Ministry of Home Affairs) हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे. राज्यांच्या घटनात्मक अधिकारांमध्ये हस्तक्षेप न करता सुरक्षा, शांतता आणि एकोपा राखण्यासाठी गृह मंत्रालय राज्य सरकारांना मनुष्यबळ आणि आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन आणि कौशल्य प्रदान करते. खासदार आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे या मंत्रालयाचे मंत्री आहेत.

गृह मंत्रालय भारतीय पोलीस सेवा (IPS), 'दिल्लीत, अंदमान आणि निकोबार पोलीस सेवा विभाग' (DANIPS) आणि 'दिल्लीत, अंदमान आणि निकोबार नागरी सेवा विभागासाठी' (DANICS) संवर्ग नियंत्रण प्राधिकरण देखील आहे. मंत्रालयाचा पोलीस-I विभाग हा भारतीय पोलीस सेवेच्या संदर्भात संवर्ग नियंत्रक प्राधिकरण आहे; तर, UT विभाग हा DANIPS साठी प्रशासकीय विभाग आहे

भारत सरकार तर्फे दिली जाणारे काही महत्त्वाचे पुरस्कार आणि पदके यांचे प्रस्ताव मागवणे, निवड करणे, पुरस्काराची शिफारस करणे आणि पुरस्कार प्रदान करण्याचे काम गृह मंत्रालय करत असते. या पुरस्कारात, भारत रत्न, पद्म पुरस्कार, जीवन रक्षा पदके, पोलीस पदके, कबीर पुरस्कार, सांप्रदायिक सदभाव पुरस्कार, अग्निशमन सेवा पदके आणि होमगार्ड आणि नागरी संरक्षण पदके इत्यादींचा समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →