राष्ट्रीय लोक मोर्चा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

राष्ट्रीय लोक मोर्चा तथा राष्ट्रीय लोक जनता दल हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे. याची स्थापना उपेंद्र कुशवाह यांनी २० फेब्रुवारी २०२३ रोजी केली. या आधी कुशवाह जनता दल (संयुक्त)चे सदस्य होते. रालोमो पक्षाची विचारसरणी कर्पूरी ठाकूर यांच्या आदर्शांवर आधारित आहे. राष्ट्रीय लोक मोर्चाची स्थापना करण्यापूर्वी उपेंद्र कुशवाह यांनी पाटणा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या परिषदेत त्यांनी महात्मा फुले समता परिषदेच्या सर्व सदस्यांना आणि जनता दल (संयुक्त) मधील त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांना आपल्या नवीन पक्षात सहभागी होण्याचे आवाहन केले. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पक्षाची स्थापना जाहीर करण्यात आली. शेखपुरा येथील जितेंद्र नाथ यांना पक्षाचे उपाध्यक्ष बनवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →