रामटेक रेल्वे स्थानक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रामटेक रेल्वे स्थानक

रामटेक हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेल्या कन्हान रेल्वे स्थानकानंतर एक फाटा रामटेकला जातो. हे नागपूर स्थानकापासून सुमारे ४१.७ किमी अंतरावर आहे. येथे २ फलाट आहेत.



येथे फक्त नागपूर व इतवारी स्थानकांसाठी गाड्या सुटतात व फक्त इतवारी व नागपूर स्थानकांवरून येथे गाड्या येतात. हे एक टर्मिनस आहे.

रामटेक येथे रामाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर गडावर असल्याने यास गडमंदिर असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →