रामटेक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक शहर आहे.
हे शहर नागपूरच्या ईशान्येस सुमारे ५४ किलोमीटर अंतरावर आहे. या नावाचा अर्थ "रामाचा डोंगर" असाच होतो. सिंदूरगिरी (किंवा शेंदराचा डोंगर) व तपोगिरी (किंवा तपस्या करण्याचा डोंगर) असे नामाभिधान या डोंगरास पूर्वी असावे. तशा प्रकारच्या शिलालेख चौदाव्या शतकांतील लक्ष्मण मंदिराजवळ आहे.
शहराच्या जवळ सुमारे १०० मीटर उंच टेकाडावर हा अनेक मंदिराचा समुच्चय आहे. टेकाडाची दक्षिण व पश्चिम बाजू नैसर्गिकरीत्याच संरक्षित आहे. उत्तरेकडे दुहेरी भिंत बांधून तटबंदी केली आहे. बाहेरील भिंत आधीच्या गवळी राजांनी बांधली असावी; तर इतर काम नंतरचे आहे. देऊळ पश्चिमेकडच्या सर्वात उंच भागात असून अंबाला तलावाच्या पश्चिम टोकाकडून टेकडीवर चढण्यास पायऱ्या आहेत. वर पोहोचल्यावर दगडी भिंत असलेले एक जुने तळे आहे. जवळच नरसिंहाची मोठी मूर्ती असलेले देऊळही आहे.
संस्कृत भाषेच्या अभ्यासाकरिता स्थापन करण्यात आलेले कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे मुख्यालय याठिकाणी आहे.
रामटेक
या विषयातील रहस्ये उलगडा.