नगरधाण
भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यात रामटेकपासून वायव्येस सुमारे ७ कि. मी. अंतरावर असलेला हा 'भुईकोट' प्रकारातील एक किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे. इसवी सनाच्या ४ थ्या शतकात ही जागा नंदीवर्धन म्हणून ओळखली जात होती. नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे. नगरधन गावाच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. नगरधनच्या भव्य दरवाजावर काही शिल्पे अंलकृत केलेली आहेत. शिरोभागी गणेशाची प्रतिमा आहे. दोन्ही बाजूंना चषक कोरलेले आहेत. दाराच्या बाजूला द्वारपाल कोरलेले असून त्यांच्या खांद्यावर कबुतर दाखवले आहे. पूर्वी निरोपानिरोपी करण्यासाठी कबुतरांचा वापर करीत असत. दाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. पूर्वी आत येणाऱ्यांची चौकशी व झाडाझडती येथेच घेतली जायची. "उमलती कमलपुष्पे" हे यादवांचे चिन्ह प्रवेशाच्या दोन्ही बाजूंस आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक आयताकृती कक्ष लागतो. येथे आत हा भुईकोट आहे. तो गोंड राजांच्या काळचा असावा. येथे एक पायऱ्याची विहीरही आहे.
नगरधाण
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?