राज्यव्यवहार कोश

या विषयातील रहस्ये उलगडा.

शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. . राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला. राज्यव्यवहार कोश हा मुळात रघुनाथ हनुमंते (पंडित) यांनी करवून घेतला होता आणि नंतर त्यांनी तो शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या वेळी नजर केला असे एक मत आहे. ह्या कोशाच्या सुरुवातीस असणारे श्लोक, ज्यानुसार हा कोश शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला असे निर्देशित होते, नंतर घातले गेले असावेत. या म्हणण्यास पुरावा हा आहे की या रचनेत हनुमंते कुळाची स्तुती करण्यासाठी कर्त्याकडून जास्त शब्द खर्ची घातले गेलेले आहेत. हा कोश राज्याभिषेकाच्या वेळी जर शिवाजी महाराजांनी करवून घेतला असता तर असे झाले नसते.

शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने झालेल्या राज्यव्यवहार कोशाचा कर्ता रघुनाथ पंडित नसून तंजावरचा ढुंढिराज व्यास हा आहे. सेतु माधव पगडींच्यामतेमात्र तो कोश रघुनाथ नारायण हणमंते(रघुनाथ पंडित) यांचाच. हा कोश फार्सी-मराठी नसून दख्खनीयावनी(उर्दू)-संस्कृत आहे. त्यातल्या १३८० शब्दांपैकी फारतर दहा टक्के शब्द मराठीत अजूनही प्रचलित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →