राज्यराणी एक्सप्रेस

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

राज्यराणी एक्सप्रेस

राज्यराणी एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ह्यांनी २०११ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ह्या गाड्यांची घोषणा केली होती. राज्यराणी गाड्या अनेक राज्यांमधील महत्त्वाच्या सांस्कृतिक, पर्यटन अथवा व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना राज्याच्या राजधानीसोबत जोडतात. ह्या रेल्वेगाड्यांना कूच बिहारची युवराज्ञी व जयपूरची महाराणी गायत्री देवी ह्यांचे नाव देण्यात आले आहे. ह्याच गाड्यांसोबत रविंद्रनाथ टागोर ह्यांचे नाव दिल्या गेलेल्या कवी गुरू एक्सप्रेस व स्वामी विवेकानंदांचे नाव देण्यात आलेल्या विवेक एक्सप्रेस ह्या रेल्वेगाड्या देखील चालू करण्यात आल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →