राजस्थानचे मुख्यमंत्री

यामागील विज्ञान आणि इतिहास.

राजस्थानचे मुख्यमंत्री

राजस्थानचे मुख्यमंत्री हे भारताच्या राजस्थान राज्याचे सरकारप्रमुख आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेले मुख्यमंत्री राजस्थानच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केले जातात. मुख्यमंत्री हे राजस्थान विधीमंडळाच्या विधानसभा ह्या सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक आहे. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ राजस्थान राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे.

१९५० सालापासून एकूण १४ व्यक्ती राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत ज्यापैकी ११ मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →