प्रभा राव (४ मार्च १९३५ - २६ एप्रिल २०१०) ह्या भारत देशातील राजस्थान व हिमाचल प्रदेश राज्यांच्या माजी राज्यपाल व १३व्या लोकसभेच्या सदस्य होत्या.
महाराष्ट्रामधील राजकारणात कार्यरत असलेल्या राव १९७२ साली प्रथम विधानसभेवर निवडून गेल्या. त्या १९७२ ते १९८९ व १९९५ ते १९९९ दरम्यान आमदारपदावर होत्या. तसेच १९८५ ते १९८९ व २००४ ते २००८ दरम्यान त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षा होत्या.
राजस्थानच्या राज्यपालपदावर असताना २६ एप्रिल २०१० रोजी त्यांचे नवी दिल्ली येथे हृदयविकाराने निधन झाले.
प्रभा राव
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?