भारतीय नौदलासाठी बनविल्या गेलेल्या राजपूत वर्गीय विनाशिका या सोविएत कशीन वर्गीय विनाशिकांचे परिवर्तीत रूप आहे. यांना कशीन वर्ग - २ असेही ओळखले जाते. भारताच्या कशीन आराखड्याच्या विशेष रूपांतरणानंतर या नौका रशियामध्ये बांधल्या गेल्या. मूळ आराखड्यात असलेले हेलिकॉप्टर पॅड,फ्लाइट एलिव्हेटर मध्ये बदलण्यात आले.
राजपूत वर्गीय विनाशिका या भारतीय नौदलातील "ब्राह्मोस" ही स्वनातीत क्षेपणास्त्र प्रणाली बसवण्यात आलेल्या पहिल्या नौका आहेत. ही प्रणाली या नौकांवर मध्य-कार्यकालीन दुरुस्ती दरम्यान बसवण्यात आली. या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये कमान आरोही प्रक्षेपकात ८ क्षेपणास्त्र आहेत.
राजपूत वर्गीय विनाशिका
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?