ब्राह्मोस (रोमन लिपी: BrahMos ;) हे भारताचे स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. स्वनातीत, म्हणजे ध्वनीच्या वेगाहून अधिक वेग असलेले, हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान, अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) व रशियाची 'एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया' संस्था, या दोघांच्या संयुक्त उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येते. याचा पल्ला ३०० किलोमीटर अंतरापर्यंत आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्राह्मोस क्षेपणास्त्र
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!