राजकुमार रौत

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

राजकुमार रौत

राजकुमार रौत (जन्म २६ जून १९९२) हे भारतीय राजकारणी आणि चोरासी मतदारसंघाचे दोन वेळा आमदार आणि बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते भारत आदिवासी पक्षाचे संस्थापक आणि सदस्य आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, ते बांसवाडा मतदारसंघासाठी खासदार म्हणून निवडून आले व त्यांनी महेंद्रजीत सिंग मालवीय यांचा २४७,०५४ मतांच्या फरकाने पराभव केला.

त्यांचा जन्म डुंगरपूर, राजस्थान येथे झाला. ते भिल्ल आदिवासी समाजाचे आहे. त्यांनी मोहनलाल सुखाडिया विद्यापीठातून कला शाखेची पदवी (बीए) पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून बॅचलर ऑफ एज्युकेशन (बी.एड.) पदवी घेतली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →