रस (सौंदर्य) हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे,ज्यात प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या कलांचा समावेश होतो.रस ही नाट्यशास्त्र, नाटक, अभिनय, साहित्य आणि संगीत ह्या कलाशाखांच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे.
भारतीय साहित्यविचारात रसविचारांची मांडणी प्रथम भरतमुनी यांनी केली. याचे विस्तारित विवेचन अभिनवगुप्त यांनी केले. एकूण नऊ रस आहेत. भारताने आठ रस व त्यांचे आठ स्थायीभाव सांगितले आहेत. पुढच्या अभ्यासकानी शांत हा नववा रस व त्याचा शांती हा स्थायी सांगितला आहे.
मनुष्याच्या ठिकाणी स्थिर व शाश्वत अशा भावना असतात. या स्थिर व शाश्वत भावनांना स्थायी भाव म्हणतात. हे स्थायी भाव म्हणजे रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, कंटाळा, विस्मय, शांती हे होय. हे सर्व स्थायी भाव कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायीभाव चाळविले जाउन नऊ प्रकारचे रस निर्माण होतात.
१. शृंगार
२. वीर
३. करुण
४. हास्य
५. रौद्र
६. भयानक
७. बीभत्स
८. अद्भुत
९. शांत
रस (सौंदर्यशास्त्र)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.