रवींद्र चव्हाण

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

रवींद्र चव्हाण

रविंद्र चव्हाण (२० सप्टेंबर, १९७०:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नेते आणि भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेतील डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

दरम्यान २०२२ ते २०२४ या काळात ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र शासनात कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळता) आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांची जबाबदारी सांभाळली.

तसेच त्यांनी पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणूनही कार्य केले. यापूर्वी, २०१६ ते २०१९ या कालावधीत त्यांनी बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण आणि अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांचे राज्यमंत्री पद भूषवले. २०२० मध्ये, चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली. ११ जानेवारी २०२५ रोजी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. १ जुलै २०२५ रोजी त्यांच्या हाती भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →