रविन थत्ते

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

रविन थत्ते

डॉ. रवीन लक्ष्मण थत्ते (रवींद्र लक्ष्मण थत्ते, (रविन थत्ते, रवीन थत्ते, रविन मायदेव थत्ते) (जन्म : १ जून, १९३९) हे एक जागतिक कीर्तीचे प्लॅस्टिक सर्जन असून मराठी लेखक आहेत. त्यांच्या आईचे आडनाव मायदेव. म्हणून ते कधीकधी मायदेव हे नाव मधले म्हणून लावतात.

डॉ. रविन थत्ते, हे FRCS, MS, MCh असून प्लॅस्टिक सर्जरी विषयाचे इ.स. १९९७ साली निवृत्त झालेले माजी प्राध्यापक आहेत. डॉ. ए.डी. डायस आणि डॉ.रविन थत्ते यांनी मुंबईच्या परळ भागात असलेल्या जी.एस. मेडिकल कॉलेजात आणि लोकमान्य टिळक ऊर्फ सायन हॉस्पिटलात इ.स. १९७९ साली प्लॅस्टिक सर्जरीचा विभाग उघडला. ए..डी. डायस यांच्या निवृत्तीनंतर रविन थत्ते त्या विभागाचे प्रमुख झाले. थत्ते यांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैद्यकीय नियतकालिकांमध्ये असंख्य संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. इतके लेख आजवर कोणाही भारतीय प्लॅस्टिक सर्जनला लिहिता आलेले नाहीत, असे समजते..

डॉ. थत्ते यांनी ज्ञानेश्वरीवर सहा पुस्तके लिहून, त्या पुस्तकांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. मात्र, ‘ज्ञानेश्वरी’च्या ध्यासाने ते विरागी अथवा अध्यात्ममार्गी झाले व त्यामुळे त्यांची सुघटन शल्यक्रियेशी (प्लॅस्टिक सर्जरीशी) असलेली नाळ तुटली असे घडले नाही. त्यांची बुद्धी तेथेही अद्यावत व तत्पर आहे. त्यासाठी ते Shortnotesinplasticsurgery.wordpress.com हा इंग्रजी ब्लॉग लिहितात. निवृत्तीनंतरही आणि त्यांची खासगी प्रॅक्टिस चालू असताना ते अनेक सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत. माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा वापर करून त्यांनी अनेक सरकारी आणि अन्य अधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांबाबत दाखविलेली अनास्था उघडकीस आणली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →