रमादेवी महिला विद्यापीठ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रमा देवी महिला विद्यापीठ हे भुवनेश्वर, ओडिशा, येथील महिलांसाठीचे राज्य विद्यापीठ आहे. इस १९६४ मध्ये भुवनेश्वरमधील एका छोट्या इमारतीत रमा देवी महिला महाविद्यालय म्हणून याची स्थापना झाली होती. 'रमादेवी चौधरी' यांच्या नावावरून विद्यापीठाला हे नाव देण्यात आले आहे. हे ओडिशातील पहिले महिला विद्यापीठ आहे. रमादेवी चौधरी या एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक होत्या. ओडिशातील लोक त्यांना माँ असे संबोधत असत.

१ जुलै २०२१ रोजी विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे 12(B) दर्जा प्रदान करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →