यॉर्कची एलिझाबेथ (११ फेब्रुवारी १४६६ - ११ फेब्रुवारी १५०३) ही राजा हेन्री सातवा याच्याशी विवाह झाल्यापासून (१८ जानेवारी १४८६ रोजी) ते १५०३ मध्ये तिचा मृत्यू होईपर्यंत इंग्लंडची राणी होती. ती राजा एडवर्ड चौथा आणि त्याची पत्नी, एलिझाबेथ वुडव्हिल यांची मुलगी होती. तिचे हेन्री सोबतचे लग्न बॉसवर्थ फील्डच्या लढाईत विजयानंतर झाले, ज्याने गुलाबांच्या युद्धांचा अंत झाला. एलिझाबेथ आणि हेन्री यांना एकत्र सात मुले होती.
एलिझाबेथचे काका रिचर्ड तिसरे यांनी १४८३ मध्ये सिंहासन ताब्यात घेतल्यानंतर लवकरच तीचे धाकटे भाऊ लंडनच्या टॉवरमधून रहस्यमयपणे गायब झाले. संसदेच्या १४८४ च्या कायदा टिटुलस रेगियसने तिच्या पालकांचे लग्न अवैध असल्याचे घोषित केले. असे झाले तरी एलिझाबेथ आणि तिच्या बहिणींचे रिचर्ड तिसऱ्याने कोर्टात स्वागत केले. रिचर्ड हा एलिझाबेथशी लग्न करण्याचा विचारात असल्याची अफवा पसरली होती. हेन्री ट्यूडरला त्याच्या आक्रमणासाठी यॉर्किस्ट समर्थनाचे महत्त्व माहित होते आणि त्याने इंग्लंडमध्ये येण्यापूर्वी एलिझाबेथशी लग्न करण्याचे वचन दिले. ह्यामुळे रिचर्डच्या यॉर्किस्ट समर्थकांमध्ये फूट पडली. ह्यामुळे हेन्री ट्यूडरच्या विजयाची शक्यता वाढली.
हेन्री ट्यूडरने रिचर्ड तिसऱ्याला युद्धात हरवले व इंग्लंडचा राजा झाला. सोबतच एलिझाबेथशी लग्न करून दोन्ही बाजुंच्या समर्थकांचे आश्वासन मिळवले.
एलिझाबेथ यांनी राजकारणात फार कमी भूमिका घेतल्याचे दिसते. तिचा विवाह यशस्वी आणि आनंदी होता असे दिसते. त्यांचे लग्न ही राजकीय तडजोड असूनही, इतिहासकार असे लिहीतात की दोघे हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. तिचा मोठा मुलगा, आर्थर, प्रिन्स ऑफ वेल्स, १५०२ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी मरण पावला आणि इतर तीन मुले देखील लहान वयात मरण पावली. तिचा दुसरा आणि एकमेव हयात असलेला मुलगा, हेन्री आठवा, पुढे इंग्लंडचा राजा झाला, तर तिच्या मुली मार्गारेट ट्यूडर आणि मेरी ट्यूडर या अनुक्रमे स्कॉटलंड आणि फ्रान्सच्या राण्या झाल्या.
१५०२ मध्ये, यॉर्कची एलिझाबेथ पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि तिचा बाळंतपणाचा काळ टॉवर ऑफ लंडनमध्ये घालवला. २ फेब्रुवारी १५०३ रोजी तिने कॅथरीन या मुलीला जन्म दिला, जिचा काही दिवसांनी मृत्यू झाला. प्रसूतीनंतरच्या संसर्गामुळे, यॉर्कच्या एलिझाबेथचा ३७ वा वाढदिवस, ११ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे तिचे कुटुंब शोकाकूळ झाले. एलिझाबेथच्या मृत्यूच्या काही काळानंतर, राजा हेन्री आजारी पडला होता आणि त्याची आई मार्गारेट ब्युफोर्ट वगळता इतर कोणालाही भेटण्याची परवानगी देत नव्हता. दोन वर्षांच्या आत, राजा हेन्री ने त्याचा सर्वात मोठा मुलगा, त्याची पत्नी, त्याची लहान मुलगी गमावले होते.
यॉर्कची एलिझाबेथ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?