एलिझाबेथ अँजेला मार्गुराइट बोवेस-ल्योन (४ ऑगस्ट १९०० - ३० मार्च २००२) ही राजा जॉर्ज सहाव्याची ची पत्नी म्हणून ११ डिसेंबर १९३६ ते ६ फेब्रुवारी १९५२ पर्यंत युनायटेड किंग्डमची आणि ब्रिटिश कॉमनवेल्थच्या अधिपत्याखालील राज्याची राणी होती. ऑगस्ट १९४७ मध्ये ब्रिटिश राजचे विघटन होईपर्यंत त्या भारताच्या शेवटच्या सम्राज्ञी होत्या. तिच्या पतीच्या निधनानंतर, तिला अधिकृतपणे राणी एलिझाबेथ राणी आई म्हणून ओळखले जात असे, तिची मुलगी राणी दुसरी एलिझाबेथ हिच्याशी गोंधळ होऊ नये म्हणून.
ब्रिटिश खानदानी कुटुंबात जन्मलेली, एलिझाबेथ १९२३ मध्ये प्रसिद्ध झाली जेव्हा तिने प्रिन्स अल्बर्ट, ड्यूक ऑफ यॉर्कशी विवाह केला. प्रिन्स अल्बर्ट हा राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांचा दुसरा मुलगा होता.
१९३६ मध्ये, एलिझाबेथचा पती अनपेक्षितपणे जॉर्ज सहावा म्हणून राजा झाला जेव्हा त्याचा मोठा भाऊ, एडवर्ड आठव्याने, अमेरिकन घटस्फोटित वॉलिस सिम्पसनशी लग्न करण्यासाठी राज्यत्याग केला. ११ डिसेंबर १९३६ रोजी एलिझाबेथचा नवरा अल्बर्ट अनिच्छेने त्याच्या भावाच्या जागी जॉर्ज सहावाच्या नावाखाली राजा बनला. एलिझाबेथ आणि तिच्या पतीला १२ मे १९३७ रोजी वेस्टमिन्स्टर ॲबे येथे युनायटेड किंग्डम आणि ब्रिटिश अधिराज्याचा राजा आणि राणी आणि भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. एलिझाबेथचा मुकुट प्लॅटिनमचा होता आणि त्यात कोहिनूर हिरा लावलेला होता. या जोडप्याने आणि त्यांच्या मुली, एलिझाबेथ आणि मार्गारेट यांनी कुटुंब आणि सार्वजनिक सेवेच्या पारंपारिक कल्पनांना मूर्त रूप दिले. डचेसने विविध प्रकारचे सार्वजनिक कार्य केले आणि तिच्या सतत आनंदी चेहऱ्यासाठी ओळखले गेले.
दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी ती तिच्या पतीसोबत फ्रान्स आणि उत्तर अमेरिकेच्या राजनैतिक दौऱ्यांवर गेली होती. युद्धादरम्यान, तिच्या अदम्य भावनेने ब्रिटिश जनतेला नैतिक आधार दिला. युद्धानंतर, तिच्या पतीची तब्येत बिघडली आणि वयाच्या ५१ व्या वर्षी १९५२ मध्ये ती विधवा झाली. तिची मोठी मुलगी दुसरी एलिझाबेथ ही वयाची २५ व्या वर्षी नवीन राणी बनली.
१९५३ मध्ये राणी मेरीच्या मृत्यूनंतर, एलिझाबेथला ब्रिटिश राजघराण्यातील मातृसत्ताक म्हणून पाहिले गेले. तिच्या नंतरच्या वर्षांत, ती कुटुंबातील एक सातत्याने लोकप्रिय सदस्य होती, अगदी अश्या वेळा देखील जेव्हा इतर देशांतील राजघराण्यांची सार्वजनिक मान्यता कमी होत होती. तिची धाकटी मुलगी प्रिन्सेस मार्गारेट हिच्या मृत्यूच्या सात आठवड्यांनंतर वयाच्या १०१ व्या वर्षी तिच्या मृत्यू झाला. मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी पर्यंत तिने सार्वजनिक जीवन सक्रियपणे चालू ठेवले होते.
३० मार्च २००२ रोजी, १५:१५ GMT वाजता, एलिझाबेथ यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी रॉयल लॉज, विंडसर येथे निधन झाले. तिची हयात असलेली मुलगी, दुसरी एलिझाबेथ तिच्या बाजूला होती. राणी आईला ख्रिसमस २००१ पासून छातीत सर्दी होत होती. १०१ वर्षे आणि २३८ दिवसांची ती ब्रिटिश राजघराण्यातील पहिली सदस्य होती जी १०० वर्षांची झाली होती . तिच्या मृत्यूच्या वेळी ती ब्रिटिश राजघराण्यातील सर्वात जास्त काळ जगणारी सदस्य होती. तिची हयात असलेली वहिनी, प्रिन्सेस ॲलिस, डचेस ऑफ ग्लॉसेस्टर, २९ ऑक्टोबर २००४ रोजी वयाच्या १०२ व्या वर्षी मरण पावली. ती कोणत्याही राजघराण्यातील सर्वात जास्त काळ जगणाऱ्या सदस्यांपैकी एक होती.
राणी एलिझाबेथ (राणीची आई)
यामागील विज्ञान आणि इतिहास.