येकातेरिनबुर्ग

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

येकातेरिनबुर्ग

येकातेरिनबुर्ग (रशियन: Екатеринбург) हे रशिया देशाच्या स्वेर्दलोव्स्क ओब्लास्तचे व उरल संघशासित जिल्ह्याचे मुख्यालय व रशियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. येकातेरिनबुर्ग शहर रशियाच्या मध्य-पश्चिम भागात युरोप व आशिया खंडांच्या सीमेजवळ व उरल पर्वतरांगेच्या पूर्वेस वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार १३.५ लाख लोकसंख्या असलेले येकातेरिनबुर्ग रशियामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील येकातेरिनबुर्ग हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. उरल स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →