पर्म (रशिया)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पर्म (रशिया)

पर्म (रशियन: Пермь; कोमी: Перым) हे रशिया देशाच्या पर्म क्रायचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. हे शहर रशियाच्या युरोपीय भागात कामा नदीच्या काठावर व उरल पर्वतरांगेजवळ वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ९.९१ लाख इतकी होती. ह्या दृष्टीने पर्म हे रशियामधील तेराव्या क्रमांकाचे शहर आहे. इ.स. १९४० ते १९६७ दरम्यान ह्या शहराचे नाव मोलोतोव असे होते.

सायबेरियन रेल्वे मार्गावरील पर्म हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →