युवक क्रांती दल ही १९६७ साली पुण्याच्या महाविद्यालयामधील तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मिळून सुरू केलेली एक चळवळ आहे. संक्षेपाने या चळवळीला युक्रांद असे ओळखले जाते. सत्याग्रही समाजवाद हा या संघटनेचा पाया होता. पर्यायाने हा पक्ष समाजवादी पक्षाचे एक छक्कल होते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राममनोहर लोहिया यांच्या विचारधारेने प्रभावित झालेले युवक मुख्यत या चळवळीत सामील झाले होते. वर्गमुक्त, जातमुक्त आणि पुरोगामी नवसमाज तयार करण्यासाठी संघर्ष करणे, दलितांचे मुक्ती लढे अहिंसात्मक पद्धतीने लढणे हा या संघटनेचा मुख्य कार्यक्रम होता. १९७० ते १९८० हा या चळवळीचा सुवर्णकाळ होता. पुणे, मराठवाडा आणि मुंबईमध्ये मुख्यत: चळवळीचा प्रभाव होता.
या दरम्यान युक्रांदने डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने केली व यशस्वी करून दाखवली. १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात युक्रांदचे अनेक कार्यकर्ते कारावासात होते. यानंतर संघटनेमध्ये फुट पडली व डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी संसदीय राजकारणात प्रवेश केला आणि जनता पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली. २००१ साली या संघटनेची पुनःस्थापना झाली. त्यानंतर ही संघटनेने अनेक आंदोलने लढवून यशस्वी करून दाखवली आहेत. सध्या डॉ. कुमार सप्तर्षी हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि जांबुवंत मनोहर हे कार्यवाह म्हणून काम पाहत आहेत.
युवक क्रांती दल
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?