युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो

युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो तथा अमेरिकेची जनगणना संस्था ही युनायटेड स्टेट्स केन्द्रीय सांख्यिकी प्रणालीमधील एक प्रमुख संस्था आहे. ही संस्था अमेरिकेच्या वाणिज्य विभागांतर्गत कार्य करते. अमेरिकेची लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सामाजिक स्थिती याबद्दलची अधिकृत आकडेवारी गोळा करणे ही या संस्थेची मुख्य जबाबदारी आहे.

अमेरिकेच्या संविधानातील कलम १, विभाग २ नुसार दर दहा वर्षांनी देशाची जनगणना करणे अनिवार्य आहे. ही जबाबदारी सेन्सस ब्युरोकडे सोपवण्यात आली आहे. या जनगणनेचा मुख्य उपयोग अमेरिकन लोकप्रतिनिधी गृहातील जागांचे राज्यानुसार वाटप करण्यासाठी केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →