युक्रेनी वायुसेना युरोपच्या युक्रेन देशाच्या संरक्षण दलाचा भाग असून याचे मुख्यालय विनित्सिया शहरात आहे. सोवियेत संघाच्या विघटनानंतर मूळ सोवियेत वायुसेनेतील अनेक विमाने युक्रेनला मिळाली व त्यातून युक्रेनी वायुसेनेची निर्मिती झाली. त्यानंतर युक्रेनने आपल्या वायुसेनेचा आकार कमी करीत असतानाच दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यातील बहुसंख्य विमाने मूळ रशिया व सोवियेत बनावटीचीच आहेत. २०२२ च्या सुमारास युक्रेनी वायुसेनेत २२५ लढाऊ विमाने होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युक्रेनी वायुसेना
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.