यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे.
हे विद्यापीठ १ जुलै १९८८ रोजी सुरू झाले.
विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ.राम ताकवले यांनी आपल्या कल्पक दृष्टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत, लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्ये प्राप्त करून घेण्यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्य देणारे अभ्यासक्रम तयार केले. त्यामुळेच अशा प्रकारच्या शिक्षणाच्या संधी या विद्यापीठामुळे उपलब्ध झाल्या.
देशातील या ५व्या मुक्त विद्यापीठास यशवंतराव चव्हाण यांचे नाव द्यावे, असा आग्रह कुसुमाग्रजांनी धरला होता. विद्यापीठाचे गीत कवी कुसुमाग्रज यांनी लिहिले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.