मोरो केशव दामले (जन्म : मालगुंड, ७ नोव्हेंबर १८६८; नागपूर-पुणे दरम्यान रेल्वे अपघातात मृत्यू, ३० एप्रिल १९१३) हे मराठीतील व्याकरणकार व निबंधकार होते. त्याचा जन्म रत्नागिरीनजीकच्या मालगुंड या गावी झाला. त्यांचे वडील केसो विठ्ठल हे प्राथमिक शिक्षक व पुढे रावसाहेब मंडलिक यांच्या वेळणे या गावच्या शेतीचे कारभारी होते. प्रसिद्ध कवी केशवसुत व पत्रकार सीताराम केशव हे मोरो केशवांचे अनुक्रमे थोरले व धाकटे बंधू. मधले बंधू मोरो केशव दामले हे मराठीतील नामवंत व्याकरणकार म्हणून प्रसिद्धी पावले. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हणले गेले. तसेच या ग्रंथात मोरो केशव दामले त्यांनी व्याकरणविषयक प्रश्नांची इतर अंगेही समोर आणली आहेत. विशेषतः विविध उपपत्तीही संकलित करून त्यांनी त्यांची चिकित्साही केली आहे. हा अभूतपूर्व ग्रंथ लिहून त्यांनी व्याकरणक्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केली. व्याकरणावर पीएच.डी. करणाऱ्यांसाठी मोरो केशव दामल्यांचे ’शास्त्रीय मराठी व्याकरण’ हा आजही मोलाचा संदर्भग्रंथ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोरो केशव दामले
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!