मोनिरा रहमान

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मोनिरा रहमान

मोनिरा रहमान बांगलादेशी मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत . त्यांचा जन्म १९६५ मध्ये जेसोर, पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश ) येथे झाला. त्यांच्या चळवळीमुळे, बांगलादेशातील महिलांवर ॲसिड आणि पेट्रोल हल्ले ४० पटीने कमी झाले आहेत. त्यांनी कायदे बदलले आहेत. त्यांनी दुर्गम भागातही त्वरित, सक्षम मदतीची खात्री तयार केली आहे आणि मॉडेल मानसशास्त्रीय आणि इतर पाठपुरावा सेवा तयार केल्या आहेत. स.न. २००६ साली मोनिरांनी त्यांच्या धाडसी सक्रियतेसाठी ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ह्युमन राइट्स डिफेंडर पुरस्कार जिंकला. त्यांनी ॲसिड सर्व्हायव्हर्स फाउंडेशन (एएसएफ)चे संस्थापक डॉ जॉन मॉरिसन सोबत काम केले आणि त्यानंतर २००२ ते २०१३ पर्यंत कार्यकारी संचालक म्हणून काम केले. स.न. २०११ मध्ये वर्ल्डस् चिल्ड्रनस् बक्षीसाने त्यांना स्न्मानित करण्यात आले. मोनिरा यांना २०१२ मध्ये राष्ट्रकुल व्यावसायिक फेलो आणि २०१३ मध्ये अशोक फेलो देण्यात आले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →