मेक लव्ह नॉट स्कार्स

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मेक लव्ह नॉट स्कार्स ही नवी दिल्लीस्थित भारतातील विना नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. ॲसिड हल्ला मुख्यत्वे महिलांवर होतो. ही संस्था ॲसिड हल्ल्यातून वाचलेल्या लोकांसोबत काम करते. ही संस्था रिया शर्मा यांनी स्थापन केली. तानिया सिंह मेक लव्ह नॉट स्कार्स संस्थेच्या सीईओ आहेत. ही संस्था ॲसिड हल्ल्यातील पीडितांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी मदत करते. या मध्ये वाचलेल्या लोकांना आर्थिक, कायदेशीर आणि शैक्षणिक मदत पुरवणे समाविष्ट आहे. ६ नोव्हेंबर २०१६ पर्यंत संस्थेने संपूर्ण भारतात सुमारे ७० वाचलेल्या लोकांना मदत केली होती. ही स्वयंसेवी संस्था सध्या निधी गोळा करण्यासाठी आणि ती पीडितांना न पाठण्याच्या आरोपाखाली चौकशीच्या कक्षेत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →