मोत्सु-जी (毛越寺) हे तेंडाई पंथाचे एक बौद्ध मंदिर आहे. ते जपानच्या दक्षिणेकडील इवाते प्रांतामधील हिराझुमी शहरात आहे. याच्या सभोवतालच्या ऐतिहासिक परिसरात दोन जुन्या मंदिरांचे अवशेष आहेत. ही मंदीरे एनरीयू-जी (圓隆寺?) आणि कशो-जी (嘉祥寺?) जोडो (शुद्ध जमीन) या बागेत आहेत. सध्याचे मंदिर १८ व्या शतकात बांधले गेले होते. पूर्वी येथे असलेल्या प्राचीन मंदिर संरचनांशी त्याचा कोणताही संबंध नाही. जून २०११ मध्ये, मोत्सु-जीची "हिरायझुमीची ऐतिहासिक स्मारके आणि स्थळे" म्हणून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाव दाखल करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोत्सु-जी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!