मोतीराम गजानन रांगणेकर (एप्रिल १०, इ.स. १९०७ - फेब्रुवारी १, इ.स. १९९५) हे मराठी नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली कुलवधू, आशीर्वाद, नंदनवन, माझे घर, वहिनी इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.
इ.स. १९६८ साली म्हापसे (गोवा) येथे झालेल्या ४९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
मोतीराम गजानन रांगणेकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?