भक्ती बर्वे

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

भक्ती बर्वे-इनामदार (सप्टेंबर १०, इ.स. १९४८ - फेब्रुवारी १२, इ.स. २००१) ह्या मराठी अभिनेत्री होत्या.

त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णराव. ते इ.स. १९८९मध्ये हृदयविकाराने निर्वतले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे हे भक्तीचे चुलतभाऊ. सुरेश सख्खा भाऊ आणि उल्का बहीण.

पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका असे. 'फुलराणी'चे ११११हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. भक्ती बर्वे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याऐवजी स्मिता जयकर त्या नाटकात काम करू लागल्या.

मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना इ.स. १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हिंदी चित्रपटांतील आघाडीचे सहअभिनेते शफी इनामदार यांच्याशी विवाह झाला. फेब्रुवारी १२ इ.स. २००१ रोजी त्यांना मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गावरअपघाती मृत्यू आला.

आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या 'माणिकमोती' या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →