तमाशासम्राट लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू, (१६ मे, इ.स. १९३३ - ७ जुलै, इ.स. २०११; कवलापूर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र) हे मराठी तमाशा कलावंत, अभिनेते व तमाशा फडाचे मालक होते. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश संभाजी खाडे म्हणजेच बाळू यांच्यासह जहरी प्याला या वगनाट्यात काळू-बाळू नावाच्या पोलीस हवालदारांच्या जोडगोळी रंगवली होती. त्यांच्या या भूमिका महाराष्ट्रभर इतक्या गाजल्या, की ते जोडनाव या दोघा भावंडांचे टोपणनाव बनले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →काळू बाळू
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.