मुकुंदराज

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मुकुंदराज (जीवनकाल: इ.स.चे १२वे शतक) हे मराठी भाषेतील आद्य कवी होते. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे.



शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील विवेकसिंधू हा आद्यग्रंथ त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला. या ग्रंथात एकूण १८ ओवीबद्ध प्रकरणे आहेत.



परमामृत हा मुकुंदराज यांनी लिहिलेला २रा ग्रंथ.

मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई शहराच्या वायव्य दिशेस ५ कि.मी अंतरावर आहे.

शहरात अमर हबीब यांनी स्थापन केलेले मुकुंदराज कविता ग्रंथालय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →