मै मुलायम सिंह यादव हा २०२१ चा हिंदी -भाषेतील चरित्रपट (चरित्रात्मक चित्रपट) आहे ज्याचे दिग्दर्शन सुवेंदु राज घोष यांनी केले आहे. या चित्रपटात मुलायम सिंह यादव यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला आहे. मीना सेठी मंडल या निर्मात्या असून या चित्रपटात अमिथ सेठी, गोविंद नामदेव, मुकेश तिवारी, प्रकाश बेलावाडी, सुप्रिया कर्णिक, सयाजी शिंदे, राजकुमार कनोजिया, जरीना वहाब, अनुपम श्याम आणि मिमोह चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट सुरुवातीला १४ ऑगस्ट २०२० रोजी प्रदर्शित होणार होता परंतु काही कारणाने याचे प्रदर्शन २ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. कोविड-19 साथीच्या आजारामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनास आणखी एकदा विलंब झाला. शेवटी २९ जानेवारी २०२१ रोजी हा चित्रपट भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मै मुलायम सिंग यादव
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.