मेरी कोम हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. प्रियांका चोप्राची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध भारतीय महिला बॉक्सिंगपटू व ऑलिंपिक कांस्य-पदक विजेती मेरी कोम हिचे व्यक्तिचित्र रंगवले आहे. ओमंग कुमार ह्याने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट होता.
मुंबई व मनाली येथे चित्रण झालेला मेरी कोम ५ सप्टेंबर २०१४ रोजी जगभर प्रदर्शित करण्यात आला. मेरी कोमला टीकाकारांनी पसंद केले. चित्रपटाची पटकथा, छयाचित्रण, प्रियांका चोप्राचा अभिनय इत्यादी बाबींसाठी मेरी कोमचे कौतुक केले गेले. तिकिट खिडकीवर देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मेरी कोम (चित्रपट)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.