मेड इन हेवन ही एक भारतीय प्रणय-नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे जी ८ मार्च २०१९ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. एक्सेल एंटरटेनमेंट द्वारे निर्मित, ही मालिका तारा आणि करण यांच्या जीवनावर आधारित आहे, जे दिल्लीतील दोन विवाह नियोजक आहे. ते "मेड इन हेवन" नावाची एजन्सी चालवतात जी विवाह नियोजनाचे काम करते. ही मालिका ॲमेझोन व्हिडिओची चौथी मूळ काल्पनिक भारतीय मालिका आहे आणि यात शोभिता धुलिपाला, अर्जुन माथूर, जिम सरभ, शशांक अरोरा, कल्की केकेला, शिवानी रघुवंशी, इश्वाक सिंग आणि मोना सिंग यांच्या भूमिका आहेत.
झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी हा कार्यक्रम तयार केला आणि त्यांनी तो अलंकृत श्रीवास्तव यांच्यासोबत लिहिला आहे. अख्तर, श्रीवास्तव, नित्या मेहरा आणि प्रशांत नायर यांनी पहिल्या सीझनच्या नऊ भागांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केले. दुसऱ्या हंगामाचे काम एप्रिल २०२० मध्ये सुरू होणार होते परंतु कोविड-१९ साथीच्या आजारामुळे ते पुढे ढकलण्यात आले. शोच्या दुसऱ्या सीझनचे चित्रीकरण एप्रिल २०२२ मध्ये पूर्ण करण्यात आले व १० ऑगस्ट २०२३ रोजी हा प्रसारित झाला.
मेड इन हेवन (दूरचित्रवाणी मालिका)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.