फोर मोर शॉट्स प्लीज! ही अनु मेनन आणि नुपूर अस्थाना यांनी दिग्दर्शित केलेली ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ वरील भारतीय हास्य-नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे. ही मालिका चार स्त्रियांच्या कथेचे अनुसरण करते. ही मालिका ॲमेझॉन प्राइम व्हिडिओची पहिली सर्व-महिला-नायक असलेली भारतीय मूळ मालिका आहे, ज्यामध्ये सयानी गुप्ता, बानी जे, कीर्ती कुल्हारी आणि मानवी गाग्रू यांनी भूमिका केल्या आहेत.
समीक्षकांनी या मालिकेला सेक्स आणि द सिटीची देसी आवृत्ती म्हणून संबोधले आहे. पहिले सत्र २०१९ मध्ये भारतातील सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या तीन प्रमुख ॲमेझॉनच्या मालिकांपैकी एक होते आणि दुसरा सीझन मे २०२० मध्ये आला. सीझन ३ हा ऑक्टोबर २०२२ रोजी आला.
फोर मोर शॉट्स प्लीज!
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?