शोभिता धुलिपाला

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

शोभिता धुलिपाला

शोभिता धुलिपाला (जन्म ३१ मे १९९२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तिने फेमिना मिस इंडिया २०१३ स्पर्धेत फेमिना मिस इंडिया अर्थ २०१३ खिताब जिंकला आणि मिस अर्थ २०१३ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. धुलिपालाने अनुराग कश्यपच्या रमण राघव २.० (२०१६) हिंदी चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली आणि त्यानंतर मेड इन हेवन (२०१९-२३) या ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या नाट्य मालिकेत मुख्य भूमिका साकारली.

धुलिपाला ही तेलुगू चित्रपट गुडाचारी (२०१८) आणि मेजर (२०२२), मल्याळम चित्रपट मूथॉन (२०१९) आणि कुरूप (२०२१), दोन भागांचे तमिळ चित्रपट पोन्नियिन सेल्वन: १ (२०२२ ) आणि पोन्नियिन सेल्वन: २ (२०२३) व क्राईम थ्रिलर मालिका द नाईट मॅनेजर (२०२३) मध्ये दिसली. ॲक्शन थ्रिलर मंकी मॅन (२०२४) सह तिने अमेरिकन सिनेमामध्ये काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →