मॅपिंग द फील्ड : जेंडर रिलेशन्स इन कंटेंपररी इंडिया हे निर्मला बॅनर्जी, समिता सेन आणि नंदिता धवन यांनी स्त्री- अभ्यासज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांकरिता संपादित केलेले व स्त्रीअभ्यासक्षेत्राच्या साहित्यामध्ये उपयुक्त अशी भर घालणारे मार्गदर्शक खंड आहेत. जादवपूर युनिव्हर्सिटीच्या स्त्री-अभ्यास विभागाने २०११ मध्ये हे खंड प्रकाशित केले. या खंडांतील शोधनिबंधांतून, स्त्री-अभ्यास ही विषयशाखा बनण्याकरिता प्रस्थापित अकादामिक क्षेत्रात करावा लागलेला संघर्ष, स्त्रीचळवळ आणि सिद्धांकन क्षेत्र यातील नाते यांचा इतिहास विद्यार्थ्यांपुढे मांडलेला आहे.
या खंडांतील शोधनिबंधांतून विविध सामाजिक उपक्षेत्रांची लिंगभाव दृष्टिकोनातून संकल्पनात्मक चर्चा केलेली आहे. केवळ उच्चशिक्षणक्षेत्रात ज्ञाननिर्मिती व साहित्य उत्पादन करणे इतकेच मर्यादित ध्येय न ठेवता यासह सामाजिक परिवर्तन घडवून आणणे,सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे व लिंगभाव समानता साध्य करणे हे व्यापक राजकीय उद्देश स्त्री- अभ्यास क्षेत्राने बाळगलेले आहे. त्यामुळे स्त्रियांच्या चळवळी तसेच परिघावरचे वंचित समाजघटक, दलित आदिवासींच्या चळवळी यांना स्त्री-अभ्यासाची चळवळ जोडून घेताना दिसते वा या चळवळी व स्त्री अभ्यासाचे विद्यालयीन क्षेत्र परस्परपूरक असल्याचे दिसते. म्हणूनचं या खंडांमध्ये शैक्षणिक क्षेत्रांतील स्त्री-अभ्यासविषयाची चळवळ व शैक्षणिक विश्वाच्या पलीकडे उभ्या राहिलेल्या स्त्रियांच्या चळवळी या दोहोंचा आढावा घेणाऱ्या शोधनिबंधांचा समावेश करण्यात आलेला आहे.
मॅपिंग द फील्ड : जेन्डर रिलेशन्स इन कंटेंपररी इंडिया
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?