मॅक्स मिर्न्यी (बेलारूशियन: Максім Мікалаевіч Мірны; ६ जुलै १९७७) हा एक बेलारूशियन टेनिसपटू आहे. १९९६ साली व्यावसायिक खेळात पदार्पण केलेल्या मिर्न्यीला एकेरीमध्ये विशेष यश मिळाले नाही. परंतु पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी टेनिसमध्ये त्याने आजवर अनेक अजिंक्यपदे जिंकली आहेत. मिर्न्यीने आजवर ६ ग्रँड स्लॅम स्पर्धांची पुरुष दुहेरी अजिंक्यपदे मिळवली आहेत ज्यांपैकी एकामध्ये त्याचा जोडीदार भारताचा महेश भूपती होता. ह्याचबरोबर मिर्न्यीने चार वेळा मिश्र दुहेरीमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.
२०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये मिर्न्यीने आपल्या देशाच्या व्हिक्टोरिया अझारेन्कासोबत बेलारूससाठी मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक मिळवले.
मॅक्स मिर्न्यी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.