सानिया मिर्झा (नोव्हेंबर १५, १९८६, मुंबई - ) ही एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. सानियाने आजवर ३ ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मिश्र दुहेरीची तर एका ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिला दुहेरी अशी एकूण ४ अजिंक्यपदे मिळवली आहेत तसेच एकेरीच्या चौथ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. ती भारतामधील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू समजली जाते. सध्या सानिया डब्ल्यू.टी.ए.च्या दुहेरी जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
सानियाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार तर २००६ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले. मिर्झा भारताच्या तेलंगण या नव्याने झालेल्या राज्याची प्रवर्तक (ॲम्बॅसॅडर) होती. २०१० साली तिने पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब मलिकशी विवाह केला.
सानिया मिर्झा
यामागील विज्ञान आणि इतिहास.