मृणालिनी गडकरी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मृणालिनी गडकरी (जन्म : १२ जानेवारी १९४९; मृत्यू: पुणे, २७ आॅक्टोबर २०१८) ह्या बंगाली साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देणाऱ्या अनुवादिका लेखिका होत्या. जर्मन भाषा घेऊन पदवी प्राप्त केल्यानंतर गडकरी यांनी मराठी विषयात एम.ए. केले. ‘कविवर्य बा. भ. बोरकर आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतील निसर्ग : एक तौलनिक अभ्यास ’ या विषयावर शोधनिबंध सादर करून त्यांनी एम.फिल. केले .रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि समकालीन मराठी कविता ’ हा त्यांचा पीएच.डी.चा विषय होता. पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि वर्ल्ड बायबल ट्रान्सलेशन सेंटर’ यांच्या सहकार्याने इंग्रजी बायबलचा आधुनिक मराठीत अनुवाद करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. विविध नियतकालिकांत त्यांचे लेखन व अनुवादित साहित्य प्रकाशित झाले आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →