तस्लीमा नसरीन (तसलिमा नासरीन) (बंगाली: তসলিমা নাসরিন ;) (२५ ऑगस्ट, इ.स. १९६२; मैमेनसिंग, बांगलादेश - हयात) ही बंगाली, बांगलादेशी डॉक्टर व लेखिका आहे. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८० च्या दशकात तिची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. स्त्रीवादी विचारसरणीमुळे, तसेच धर्मावरील व विशेषकरून इस्लामावरील टीकेमुळे इ.स.च्या २०व्या शतकाच्या अखेरीस तिचे व्यक्तिमत्त्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. इ.स. १९९४मध्ये ती बांगलादेशातून परागंदा झाली व तिने भारतात आश्रय घेतला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तस्लीमा नसरीन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?