मीरा जास्मिन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मीरा जास्मिन

जास्मिन मेरी जोसेफ उर्फ मीरा जास्मिन ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करते., जस्मिनने २००१ मध्ये लोहितदास चित्रपट 'सूत्रधरन' द्वारे पदार्पण केले. त्यानंतर तिने दक्षिण भारतीय भाषांमधील विविध व्यावसायिक आणि समीक्षकांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले ज्यामुळे ती २००० च्या दशकातील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक बनली.



मीरा जास्मिनचा जन्म १५ फेब्रुवारी १९८२ रोजी केरळमधील तिरुवल्ला येथील कुट्टापुझा गवात जोसेफ आणि अलेअम्मा यांच्या पोटी झाला. ती पाच मुलांपैकी चौथी होती. तिला दोन बहिणी आहेत, जिबी सारा जोसेफ आणि जेनी सुसान जोसेफ, ज्यांनी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे आणि दोन भाऊ आहेत, त्यापैकी एक जॉर्ज सहाय्यक छायांकनकार म्हणून काम करत होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →