मीना कपूर (१९३०:कलकत्ता - २३ नोव्हेंबर, २०१७, मुंबई) या एक हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन करणाऱ्या गायिका होत्या. त्यांचे वडील विक्रम कपूर हे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते. चित्रपट निर्माते पी.सी. बरुआ हेही त्यांचे नातेवाईक होते. यांमुळे कपूर यांचा चित्रपटात प्रवेश सुकर झाला.
संगीतकार एस.डी. बर्मन यांनी कपूर यांना लहान वयातच संधी दिली. अथ दिन या चित्रपटात त्यांनी प्रथम पार्श्वगायन केले. १९४० ते ६५ या काळात कपूर यांनी अनेक गीते गायली.
त्यांचा आवाज अतिशय सुंदर, नितळ, स्वच्छ आणि निकोप असा होता. त्यांचा आवाज सहजपणे वळत अशे आणि त्या गाण्यामध्ये अनेक हरकती आणि मुरकती घेत असत.
कपूर यांचा संगीतकार अनिल विश्वास यांच्याशी १९५९ मध्ये विवाह झाला. अनिल विश्वासनी चित्रपटसृष्टीतून कंटाळून दिल्ली आकाशवाणीमध्ये काम करण्यासाठी तेथे गेले. मीना कपूर याही आपली कारकीर्द गुंडाळून त्यांच्याबरोबर दिल्लीला गेल्या. त्यानंतरही त्यांनी निवडक चित्रपटांत पार्श्वगायन केले.
मीना कपूर
थोडक्यात पण महत्त्वाचे.