मिलेट नेटवर्क ऑफ इंडिया

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मिलेट नेटवर्क ऑफ इंडिया

मिलेट नेटवर्क ऑफ इंडिया इंग्रजी: Millet Network of India (लघुरूप: मिनी) ही एक भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांना सहाय्य करणारी संस्था आहे. पारंपारिक पिकाचे गुण आणि फायदे ओळखणाऱ्या शंभर महिलांनी या 'ना नफा ना तोटा' तत्वावरील संस्थेची स्थापना केली आहे. या गटाने गावातील शेतकऱ्यांना कमी पाण्याचा वापर आणि सेंद्रिय खतासह भरड धान्ये पिकवण्यास मोठी मदत केली आहे. यांची प्रतिस्पर्धा ही भातासारख्या पिकाशी होती, ज्याला सरकारी अनुदानाचा फायदा भेटतो. जेव्हा की भरड धान्ये पिकवताना असा कोणताही सरकारी आधार या शेतकऱ्यांना भेटत नव्हता. यामुळे या संस्थेला नारी शक्ती पुरस्कार आणि 'इक्वेटर अवार्ड' असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →