मिदी-पिरेने हा दक्षिण फ्रान्समधील एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्सच्या संलग्न २२ प्रदेशांपैकी आकाराने सर्वात मोठ्या असणाऱ्या ह्या प्रदेशाचे क्षेत्रफळ डेन्मार्क देशापेक्षाही अधिक होते. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील महत्त्वाचे शहर मिदी-पिरेनीजची राजधानी होती. ह्या प्रांताचे नाव मिदी (अर्थ: दक्षिण फ्रान्स) व पिरेनीज (फ्रान्स व स्पेनच्या सीमेवरील पर्वतरांग) ह्या दोन शब्दांवरून पडले होते. २०१६ साली लांगूदोक-रूसियों व मिदी-पिरेने हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑक्सितानी ह्या नव्या प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिदी-पिरेने
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.