मिताली राज (जन्म : ३ डिसेंबर १९८२) या भारताकडून क्रिकेट ह्या खेळात आंतरराष्ट्रीय कसोटी सामने, एकदिवसीय सामने, २०-२० फटकांचे सामने खेळलेल्या महिला खेळाडू आहेत. त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. पुष्कळदा त्यांची वर्षातील उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणूनही निवड झालेली आहे. एकदिवसीय सामन्यांत सलग सात अर्धशतके करणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू आहेत. मिताली राज यांनी एकाहून अधिक आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (२००५ आणि २०१७) भारताचे नेतृत्व केले असून असा मान मिळणाऱ्या त्या एकमेव महिला खेळाडू आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिताली राज
थोडक्यात पण महत्त्वाचे.