मिकीनी ग्रीक ही ग्रीक भाषेचा सर्वात जुना ज्ञात उपप्रकार आहे. ही भाषा मिकीनी ग्रीसमध्ये (इ.स.पू. १६व्या ते १२व्या शतकांच्या दरम्यान) मुख्य ग्रीक भूभाग आणि क्रेतेमध्ये बोलली जात होती. या रेखीय बी लिपीत लिहिल्या गेलेल्या या भाषेचे अवशेष क्रेतेमध्ये इ.स.पू. १४ व्या शतकापूर्वीच्या शिलालेखांमध्ये सापडतात. हे शिलालेख बव्हंश मध्य क्रेतेमधील क्नोस्सोस, तसेच पेलोपोनेसच्या नैऋत्येकडील पिलोस इथे सापडलेल्या मातीच्या पाट्यांवर आहेत. इतर पाट्या मिकीनाइ, तिरिन्स आणि थेबेस येथे आणि पश्चिम क्रेतेमधील खानिया येथे सापडल्या आहेत. या भाषेला मिकीनी ग्रीसमधील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या मिकीनीचे नाव दिले आहे.
या लिपीतील शिलालेखांचा बराच काळ उलगडा झालेला नव्हता. या लिखाणाबद्दल अनेक भाषा सुचवल्या गेल्या होत्या. मायकेल व्हेंट्रिस यांनी ॲलिस कोबर यांच्या संशोधनाचा आधार घेत १९५२ मध्ये त्या लिपीचा उलगडा केला.
मिकीनी ग्रीक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.