माहूरची पांडवलेणी महाराष्ट्राच्या माहूर शहराजवळ असलेली लेणी आहेत.
माहूरच्या बसस्थानकाजवळ एका टेकडीत ही लेणी कोरलेली आहेत. राष्ट्रकूटकालीन या लेण्यात असंख्य खांबानी युक्त असे १५ मीटर उंचीचे मोठे दालन व त्याला जोडून गर्भगृह कोरले आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील द्वारपालाचे भव्य शिल्प लक्ष वेधून घेते. खांबावरील शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे आणि एका दालनातील नागराज ही शिल्पे महत्त्वाची आहेत.
गाभाऱ्यात सध्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आढळते. या लेण्यांना पांडवलेणी असेही म्हणतात.
माहूरची पांडवलेणी
थोडक्यात पण महत्त्वाचे.