कार्ले लेणी

या विषयातील रहस्ये उलगडा.

कार्ले लेणी

कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि.मी. अंतरावर आहे. ६ किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. कार्ला गुंफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →